आधुनिक काळात बदलती जीवनशैली, स्ट्रेस, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषणामुळे लोकांचे केस कमी वयात पांढरे होऊ लागले आहेत. पोषक तत्वांची कमतरता हेही केस पांढरे होण्याचे कारण आहे. अशावेळी काही नैसर्गिक उपायांच्या केस काळे करता येऊ शकतात.
आवळा - केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकता. त्यासाठी एका वाटीत 2 चमचे आवळ्याची पावजर घेऊन त्यात 2 चमचे लिंबाचा रस मिसळावा आणि त्यात एक ग्लास पाणी घालून मिश्रण गरम करावे. हे पाणी कोमट झाल्यावर त्याने केस धुवावेत.
मेथीच्या बिया - केस काळे करण्यासाठी मेथीच्या बियांचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस मुळापासून मजबूत होतात. त्यासाठी एक चमचा मेथी दाणे हे मोहरीच्या तेलात गरम करून ते तेल केसांना लावावे. नियमितपणे याचा वापर केल्यासे तुमचे केस काळे होऊ शकतात.
कांद्याचा रस - केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी कांद्याचा रस केसांना लावा. हा रस केस काळे करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. कांदा किसून त्याचा रस पिळून घ्यावा व तो केसांना लावावा. थोड्या वेळाने साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.
खोबरेल तेल - अकाली पांढरे झालेले केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी केसांना नियमितपणे खोबरेल तेल लावा. यामुळे केसांना पोषण मिळकते व ते मजबूतही होतात, त्यांची वेगाने वाढ होते.