कोरोना काळात असे करा पैशांचे नियोजन करा
पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँक किंवा टपाल कार्यालयात लेखी अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर, खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आणखी एक अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला किमान वार्षिक योगदान 500 रुपये आणि 50 रुपये दंड भरावा लागतो.
पीपीएफ खात्यात दर वर्षाला किमान 500 रुपये गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात या खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात किमान 500 रुपये भरले नाही, तर त्याचे अकाऊंट निष्क्रीय होते. त्यानंतर या पीपीएफ अकाऊंटवर कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. तसेच हे अकाऊंट मॅच्युरिटी डेटपूर्वी बंदही करता येत नाही.
PPF Account
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडणे फार सोपे आहे. तुमचे पीपीएफ खाते किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीसाठीचे पीपीएफ अकाऊंट हे कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते. हे खाते उघडण्यासाठी किमान 500 रुपये आवश्यक आहेत.