PHOTO | विजेतेपदासाठी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने, ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार सामना

WTC Final च्या निमित्ताने टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंडच्या 'या' खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

| Updated on: May 09, 2021 | 5:50 PM
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) जेतेपदासाठी 18-22 जून दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात (Southampton) साऊथम्पटनमध्ये लढत रंगणार आहे. ट्रॉफी उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. त्यासाठी कसून सराव केला जात आहे. या एका सामन्यात उभयसंघातील 10 खेळाडूंमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे.

1 / 6
Virat Kohli vs Trent Boult | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडमध्ये 10 कसोटींमध्ये 36.35 च्या सरासरीने 727 धावा केल्या आहेत. विराटची ही सरासरी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका विरुद्धच्या तुलनेत कमी आहे. विराटने  2018 च्या दौऱ्यातील 5 सामन्यात  3 अर्धशतक और 2 शतक झळकावले होते. त्यामुळे विराट तशीच कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. मात्र त्यासाठी विराटला ट्रेन्ट बोल्टचा सामना करावा लागेल. बोल्ट न्यूझीलंडच्या महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे.

2 / 6
Ishant Sharma vs Kane Williamson | या सामन्यात दुसरी लढत ही इशांत शर्मा आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमनसमध्ये रंगणार आहे. केन टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज आहे. तो आलेल्या चेंडूनुसार त्याला न्याय देतो. तर इशांतच्या पाठीशी 13 वर्षांचा तगडा अनुभव पाठीशी आहे. यामुळे या दोघांपैकी कोण वरचढ ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

3 / 6
Rohit Sharma vs Tim Southee | हिटमॅन रोहित शर्मा. या सामन्यात रोहित सलामीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहितने सलामीला खेळताना मायदेशात शानदार कामगिरी केली आहे. मात्र रोहितला इंग्लंडमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विशेष काही करता आले नव्हते.  त्यामुळे रोहितकडून या अटीतटीच्या लढतीत चांगली खेळी करावी लागेल. यासाठी रोहितला टीम साऊथीच्या स्विंगचा सामना करावा लागेल. साऊथीला चेंडू दोन्ही बाजूला वळवता येतो. इंग्लंडमध्ये चेंडू आणखी वळतो. त्यामुळे रोहितसमोर साऊथीचं आव्हान असणार आहे.

4 / 6
Cheteshwar Pujara vs Neil Wagner | चेतेश्वर पुजारा म्हणजेच टीम इंडियाचा तारणहार आणि टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज. भारतीय संघाची आधुनिक वॉल. पण या भिंतीला उसळणाऱ्या चेंडूचा (बाऊन्सर) धोका आहे. तशी पुजाराला अंगावर चेंडू झेलण्याची सवय आहे. मात्र यंदा त्याला नील वॅगनरचा सामना करायचा आहे.  पुजारा या गोलंदाजाच्या या बाऊन्सरचा यशस्वीरित्या सामना करेल, अशीच आशा सर्व भारतीय चाहत्यांना आहे.

5 / 6
 Jasprit Bumrah vs Ross Taylor | 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचा मुख्य अस्त्र. बुमराहने 19 कसोटींमध्ये 83 विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहसमोर न्यूझीलंडचा अनुभवी रॉस टेलरचे आव्हान असणार आहे. टेलर अनुभवसंपन्न फलंदाज आहे. त्यात प्रश्न पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा आहे. रॉस न्यूझीलंडचा हुकमाचा एक्का आहे. यामुळे बुमराहसमोर टेलरचा काटा काढण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे ही जबाबदारी बुमराह किती सार्थपणे पार पाडतो की अपयशी ठरतो, यावर सर्वांचच लक्ष असेल.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.