सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. या हंगामात अशी अनेक फळे आहेत, जी तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. या फळांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन असते. जे आपल्या शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढवते. हिवाळ्यामध्ये अशा फळांचे सेवन केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
हिवाळ्यात पेरूची आवक प्रचंड वाढते. पेरूमध्ये व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढवतात आणि पेशींचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
हिवाळ्याच्या मोसमात पेअर अर्थात नाशपती या फळाची विक्री देखील मोठ्याप्रमाणात होते. पेअर जितका स्वादिष्ट आहे, तितकाच त्याचा रसही फायदेशीर मानला जातो. नाशपतीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जसे की व्हिटॅमिन ई आणि सी.
संत्र्यामध्ये व्हिटामिन सी आणि कॅल्शियम हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे फळ शरीरास आतून मजबूत बनवते. जर आपल्याला संत्रे आवडत नसेल, तर आपण त्याचा रसही पिऊ शकता.
सफरचंद शरीराला बर्याच रोगांपासून वाचवण्यासाठी प्रभावी आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीरातील जळजळ आणि सूज कमी करतो. पेक्टिन, फायबर, व्हिटामिन सी आणि के हे घटक सफरचंदांमध्ये आढळतात.
मोसंबी हे एक आंबट फळ आहे, जे व्हिटामिन सीने समृद्ध आहे. आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. मोसंबीमध्ये आढळणारे फायबर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.