स्टीव्ह स्मिथचं सलग दुसरं शतक, भारताविरुद्ध नोंदवला एक खास रेकॉर्ड
मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. तसेच पहिल्या डावात 450 पार धावा करत सामना विजयावर दावा ठोकला आहे. स्टीव्ह स्मिथने 167 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह आपले 34 वे कसोटी शतक झळकावले. तसेच भारताविरुद्ध एका खास विक्रमाची नोंद केली आहे.
Most Read Stories