टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचं चौथा कसोटी सामन्यासह मालिका जिंकून WTC Final मध्ये पोहचण्याकडे लक्ष आहे. या सामन्यात आर अश्विन याच्याकडे लक्ष असणार आहे.
अश्विनला या चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा दिग्गज अनिल कुंबळे याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. अश्विनला कुंबळेचा हा विक्रम मोडीत काढण्यासाठी 5 विकेट्स घ्यावे लागतील.
अश्विनने 5 विकेट्स घेतल्यास तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम अनिल कुंबळे याच्या नावावर आहे.
अनिल कुंबळे यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 111 तर आर अश्विन याने 107 विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांशिवाय टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला 100 पेक्षा अधिक विकेट्स घेता आलेल्या नाहीत.
तसेच कुंबळे आणि अश्विन या दोघांच्या नावावर भारतात 25 वेळा 5 विकेट्स घेण्याची नोंद आहे.अश्विनने आणखी 5 विकेट्स घेतल्यास तो कुंबळेला मागे टाकेल.