Marathi News Photo gallery Ind vs wi thise 5 players win test series againstwest indies latest marathi sports news
Ind vs WI : टीम इंडियाचे हे प्लेअर चालले तर वेस्ट इंडिज गमावणार मालिका
12 जुलैला सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरूद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचे हे महत्त्वाचे खेळडू चालले तर आपण सहज मालिका जिंकू शकतो.
Follow us
रवींद्र जडेजा एकटा सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. ऑल राऊंडर असल्याने बॉलिंग आणि बॅटींग दोन्ही चालली तर त्याचा भारताला फायदो होऊ शकतो. रवींद्र जडेजाने आपल्या दमदार कामगिरीने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकवले आहेत.
मोहम्मद सिराज टीम इंडियाचा सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज आहे, गेल्या 1 वर्षापासून मोहम्मद सिराजने टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची उणीव जाणवू दिली नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होईल. वर्ल्ड टेस्टच्या अंतिम सामन्यामध्ये रहाणेने दमदार खेळी करत टीम इंडियाला सावरलं होतं. अजिंक्य रहाणेने 83 कसोटी सामन्यात 12 शतके झळकावत 5066 धावा केल्या आहेत.
IPL 2023 मध्ये विराट कोहलीने 2 शतके आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 639 धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली एक हुमकी खेळाडू ठरणार आहे.