देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रपैकी एक असणाऱ्या श्री विट्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज स्वातंत्र्यदिना निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांनी आणि पानांनी सजावट करण्यात आली आहे.
ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी केली आहे, यामध्ये शेवंती, कामिनी, और्केड कारनिशन , झेंडु, अशा विविध दोन टन फुलांचा आणि पानांचा वापर करुन देवाचा गाभारा , सोळखांबी , सभामंडप,रुक्मिणी माता गाभारा तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत होते. लोकांनी मंदीरात सजावट पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
प्रत्येकवर्षी अशा पद्धतीची सजावट केली जाते, यंदाची सजावट अधिक आकर्षक झाली असून लोकांचं लक्ष खेचून घेत आहे.
त्याचबरोबर केलेल्या सजावटीचे फोटो सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही भक्त तिथं जाऊन दर्शन घेत आहेत. त्यानंतर सेल्फी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.