Photo | India Tour Australia, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध नव्या जर्सीत
Follow us
आयपीएलची धूम आता संपली आहे. यानंतर टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे.
‘चला नवं नॉर्मल स्वीकारु’, असं म्हणत बीसीसीआयने नव्या जर्तीतले टीम इंडियाचे तीन फोटो ट्विट केले आहेत.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह टीममधले अन्य खेळाडू नव्या जर्सीत दिसून येत आहेत. ही नवी जर्सी भारतीय प्लेअर्सच्या अंगावर शोभून दिसतीये.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने देखील भारताविरुद्ध खेळताना नव्या जर्सीचं अनावरण केलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या जर्सीबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. बुधवारी (11 नोव्हेंबर) रोजी या जर्सीचं अनावरण केलं गेलं. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्ध टी 20 मालिकेत ही स्पेशल जर्सी परिधान करणार आहे.