रिषभ पंतने 52 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीचा दुसरा दिवस, भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि विकेटकीपर रिषभ पंतच्या खणखणीत शतकांनी गाजवला. पुजाराने 193 तर पंतने नाबाद 159 धावा ठोकल्यानंतर, भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 24 धावा केल्या. टीम इंडियाचा हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. पुजारा […]