India vs Pakistan Playing XI : रोहितचं ठरलंय, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग 11
IND vs PAK, T20 World Cup 2024, Predicted Playing XI : टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज लढतीला काही तासांचा अवधी बाकी आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं असणार आहे. दोन्ही टीमचा एक-एक सामना झाला असून टीम इंडियाने आयर्लंडचा आठ विकेटने पराभव केला होता. तर पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात यूएसने चारीमुंड्या चीत केलं होतं. त्यामुळे पाकिस्तान संघ उद्याचा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळू शकतं पाहा.
Most Read Stories