Photos : सिंगापूरच्या जहाजात महिला रुग्णाची प्रकृती बिघडली, तातडीच्या मदतीसाठी अखेर भारतीय नौदल धावलं
भारताचं नौदल जसं देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी तत्पर आहे. असाच एक अनुभव सिंगापूरच्या जहाजावर तब्येत बिघडलेल्या मलेशियाच्या महिला नागरिकाला आलाय.
Follow us
भारताचं नौदल जसं देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी तत्पर आहे. तसंच ते इतर कोणत्याही अडचणीच्या वेळी धावून यायला देखील पुढे असतं.
असाच एक अनुभव सिंगापूरच्या जहाजावर तब्येत बिघडलेल्या मलेशियाच्या महिला नागरिकाला आलाय.
आज (21 जानेवारी) पहाटे 6 वाजता भारतीय नौदलाला एक आपत्कालीन स्थितीचा कॉल आला. यात सिंगापूरच्या जहाजावर एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय मदतीची विनंती करण्यात आली.
गीता सेल्वाराजा या 34 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला श्वास घेणंही अवघड झालं होतं. त्यामुळे तिच्या जीवालाही धोका होण्याची शक्यता निर्माण झाली.
याआधी या रुग्णाला हलवण्याचे दोन प्रयत्न झाले, मात्र ते अपयशी ठरले.
अखेर भारतीय नौदलाची मदत मागण्यात आली. यानंतर भारतीय नौदल धावून आलं आणि आयएनएस शिक्रावरील नौदलाच्या हेलिकॉप्टरचा उपयोग करुन या रुग्णाला सुरक्षितपणे रुग्णालयात हलवण्यात आलं.