भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचं नेटवर्क आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे वेळोवेळी नियम बदलत असते. तसेच अधिक सुविधा उपलब्ध करून देते.
लोअर बर्थसाठी अशाच काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि लोअर बर्थ घ्यायचा असेल. बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला हे नियम माहित असणं गरजेच आहे.
भारतीय रेल्वेनुसार खालचा बर्थ काही लोकांसाठी आरक्षित आहे. त्यांना ही जागा आधी दिली जाते. त्यानंतर तो इतरांना दिला जातो.
लोअर बर्थ प्रथम दिव्यांगांना दिला जाईल, असा रेल्वेचा नियम आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर इतरांना वाटप केलं जातं.
रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार स्लीपर क्लासमध्ये चार आणि एसीमध्ये दोन जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गरीब रथ ट्रेनमध्ये अपंगांसाठी दोन जागा राखीव आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना न विचारता बर्थ दिले जात आहेत.
गर्भवती महिला असेल तर तिलाही लोअर बर्थ दिला जाईल. तुम्ही IRCTC वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.