संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना भारतीय रेल्वेने आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाची कमाई केली आहे.
यंदाच्या मे महिन्यात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. मे महिन्यात रेल्वेने 114.8 मिलियन टन मालाची वाहतूक केली. या माध्यमातून रेल्वेला 11604.94 कोटी रुपये मिळाले.
Konkan Railway Recruitment 2021
मालवाहतुकीमध्ये प्रामुख्याने कोळसा, लोह, खाद्यपदार्थ, खनिज तेल आणि सिमेंटचा समावेश आहे.
गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढवण्यावर विशेष लक्ष दिले आहे. मालगाड्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.