Marathi News Photo gallery Indian wrestler Vinesh Phogat arrived in india breaks down at Delhis IGI Airport paris olympics 2024
Vinesh Phogat : भारतात दाखल होताच विनेश फोगाटच एकदम जंगी स्वागत, डोळ्यात पाणी, ती एवढच बोलली की….
Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अशी एक गोष्ट घडली की, ज्यामुळे अख्खा भारत हळहळला. भारताला हक्काच एक मेडल मिळू शकलं नाही. फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाने घात केला. आज विनेश फोगाटच भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं.
1 / 10
भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच आज भारतात आगमन झालं. फक्त 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेशला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेशला मेडल मिळालं नाही.
2 / 10
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचं हिरो सारख जंगी स्वागत करण्यात आलं. पदक विजेत्यांच जसं स्वागत होतं, तसच विनेशच स्वागत करण्यात आलं.
3 / 10
विमानतळावरील हे दृश्य पाहून विनेशही भारावली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती एवढच म्हणाला की, "सगळ्या देशवासियाचे आभार. मी भाग्यशाली आहे" यावेळी भारत की शेरनी, भारताची शान, अभिमान विनेश फोगाट अशा घोषणा देण्यात येत होत्या.
4 / 10
फक्त 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अपात्र ठरवण्यात आलं. ती 50 किलो वजनी गटात खेळत होती. विनेश फोगाटच ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित होतं.
5 / 10
पण फक्त 100 ग्रॅम जास्त वजन भरल्यामुळे तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे तिच्या हक्काच रौप्य पदकही मिळू शकलं नाही.
6 / 10
खरंतर विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी केलेली की, ती सुवर्ण पदक जिंकणार असा देशवासियांना विश्वास होता.
7 / 10
तिने फायनलमध्ये दाखल होईपर्यंत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सहज धुळ चारली होती.
8 / 10
जपानच्या एकही सामना न हरलेल्या कुस्तीपटूला विनेशने पहिल्याच राऊंडमध्ये चीतपट केलं होतं. विनेश ज्या वजनी गटात खेळत होती, तिथे तिचं वजन 50 किलोच हवं होतं. पण 100 ग्रॅम जास्त वजन झाल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं.
9 / 10
सेमीफायनल जिंकली, त्या रात्री विनेशच वजन 52 किलो होतं. तिने ते वजन कमी करण्यासाठी रात्रभर मेहनत केली.
10 / 10
सायकलिंग केली, दोरी उड्या मारल्या पण अखेर एका टप्प्यावर 100 ग्रॅम वजन कमी होऊ शकलं नाही. त्याची किंमत तिनेच नाही सगळ्या देशाने चुकवली. विनेशला हे मेडल मिळू न शकल्याने अख्खा देश हळहळला.