कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र आता अनलॉकमुळे हळूहळू जग पूर्वपदावर येत आहे.
आता काही अटींसह सिनेमागृह सुरू करण्यात आली आहेत. मात्र असं असलं तरी प्रेक्षकवर्ग सिमेमागृहांकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे.
त्यासाठी आता मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत.
त्यांनी आता चक्क एकमेकांना सिनेमागृहांमध्ये जाण्याचं चॅलेंज केलं आहे.
अभिनेता ललीत प्रभाकरनं काही कलाकारांना हे चॅलेंज केलं आहे. त्यालील काहींनी हे चॅलेंज पूर्ण देखील केलं आहे.