तब्बल 1 अब्ज डॉलर कमावणारा ॲनिमेटेड चित्रपट; मोडले सर्व विक्रम

| Updated on: Jul 02, 2024 | 4:35 PM

केल्सी मॅन यांनी दिग्दर्शित केलेला 'इन्साईड आऊट - 2' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. एमी पोहलर, माया हॉक, फिलीस स्मिथ, लुईस ब्लॅक, टोनी हेल आणि लिझा लापिरा यांनी या चित्रपटातील प्रेक्षकांच्या लाडक्या ॲनिमेटेड पात्रांना आवाज दिला आहे.

1 / 5
डिस्ने आणि पिक्सर यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या 'इन्साईड आऊट' या सुपरहिट अॅनिमेशन चित्रपटाचा पुढचा भाग 'इन्साईड आऊट - 2' नुकताच प्रदर्शित झाला. दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत कमाईचा मोठा विक्रम रचला आहे.

2 / 5
या चित्रपटाने 3 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जगभरातून 1 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणूनच सर्वात कमी कालावधीत 1 अब्ज डॉलर क्लबमध्ये समाविष्ट होणारा 'इन्साईड आऊट - 2' हा एकमेव अॅनिमेटेड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने केलेल्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे याआधीच्या अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत निघाले आहेत.

3 / 5
याआधी 'फ्रोझन - 2' या अॅनिमेशन चित्रपटाने 25 दिवसांत 1 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. 'इन्साईड आऊट - 2' या चित्रपटाने भारतातही उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटाने भारतात केवळ 19 दिवसात 101.48 कोटी रुपयांची (12.7 दशलक्ष डॉलर्स) कमाई केली आहे.

4 / 5
भारतातही सर्वात जलद गतीने 100 कोटी कमावणाऱ्या अॅनिमेशन चित्रपटांच्या यादीत 'इन्साईड आऊट - 2' या चित्रपटाने वरचा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, भारतात 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील 11 पैकी 8 चित्रपट डिस्ने आणि पिक्सरचे आहेत.

5 / 5
'इन्साईड आऊट - 2' या चित्रपटातील पात्रांच्या भावनिक प्रवासाने जगभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलंय. मानवी भावनांचं प्रतिनिधित्व करणारी पात्रं सादर करून आपल्या अंतर्मनात सुरू असलेल्या गुंतागुंतीचा खोलवर जाऊन अभ्यास करण्याची चित्रपटाची क्षमता यातून स्पष्ट होते.