सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात किंग्जस इलेव्हन पंजाबचा फिरकीपटू रवी बिश्नोईने अनोखी कामगिरी केली. रवीने जॉनी बेअरस्टो, डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समदला बाद केलं.
रवी बिश्नोई एकाच सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांना बाद करणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी आयपीएलच्या 12 व्या मोसमात म्हणजेच 2019 मध्ये हरभजन सिंहने जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरला एकाच सामन्यात बाद करण्याची किमया केली होती.
कर्णधार लोकेश राहुलने 16 वं षटक रवीला टाकायला दिलं. हे षटक सामन्यातील टर्निंगपॉइंट ठरलं. रवीने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वॉर्नरला ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर बेअरस्टोला एलबीडबल्यू बाद केलं.
बेअरस्टोने 97 धावा केल्या. तर वॉर्नरने 52 धावांची खेळी केली. या दोघांनी 160 धावांची सलामी भागीदारी केली. वॉर्नर-बेअरस्टोने जोडीने दुसऱ्यांदा दीडशतकी भागीदारी केली. अशी भागीदारी अजूनही कोणत्याच जोडीला करता आली नाही.