आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा स्टार खेळाडू सुनील नारायणने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
सुनील नारायण लवकरच बाबा होणार आहे. याबाबतची माहिती सुनीलने इंस्टाग्रामवरुन दिली आहे. त्याने यासंदर्भात आपल्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला आहे.
सुनीलने यंदाच्या मोसमातील 6 सामन्यात 5 विकेट्स घेतले आहेत. तसेच त्याने 44 धावाही केल्या आहेत. कोलकाताने यंदाच्या मोसमात 9 सामने खेळले आहेत. या 9 पैकी 5 सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे.
सुनीलला संश्यास्पद बोलिंग अॅक्शनमुळे काही दिवसांआधी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे कोलकाताला दिलासा मिळाला आहे. पंजाबविरुद्धच्या 10 ऑक्टोबरच्या सामन्यात सुनीलच्या बोलिंग अॅक्शनबाबत तक्रार करण्यात आली होती.