IPL 2022: RCB येत्या 12 मार्चला करणार चार मोठ्या घोषणा, नव्या कॅप्टनचं नाव येणार समोर
IPL 2022: इंडियन प्रिमियर लीगमध्ये (IPL) चेन्नई सुपरकिंग्स (CSK) बरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची एक वेगळी मोठी फॅन आर्मी आहे. भले RCB ने आतापर्यंत आयपीएलचे एकही जेतेपद मिळवले नसेल, पण फॅन्सनी आपल्या संघाची साथ सोडलेली नाही.
1 / 5
इंडियन प्रिमियर लीगमध्ये (IPL) चेन्नई सुपरकिंग्स (CSK) बरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची एक वेगळी मोठी फॅन आर्मी आहे. भले RCB ने आतापर्यंत आयपीएलचे एकही जेतेपद मिळवले नसेल, पण फॅन्सनी आपल्या संघाची साथ सोडलेली नाही. विराट कोहलीच्या सर्व चाहत्यांना RCB चा संघ मनापासून आवडतो. आता विराट कोहली या संघाचा कर्णधार नाहीय. पण फॅन्स आजही या संघावर जीव ओवाळून टाकतात. आरसीबी येत्या 12 मार्चला आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राइज देणार आहे. (PC-AFP)
2 / 5
RCB ने मंगळवारी टि्वट करुन येत्या 12 मार्चला मोठी घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे फॅन्सनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. आरसीबीच्या टीमने अजून आपल्या कॅप्टनची घोषणा केलेली नाही. य़ा शर्यतीत फाफ डुप्लेसी आघाडीवर आहे. काही जण दिनेश कार्तिकचही नाव घेत आहेत. (PC-AFP)
3 / 5
कर्णधाराच्या नावाशिवाय RCB येत्या 12 मार्चला संघाचे नवीन नाव आणि नव्या जर्सीचीही घोषणा करु शकते. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ठेवलं जाऊ शकतं. संघाचं नाव बदलल्यानंतर आरसीबीच्या जर्सीचा रंगही बदलणार आहे. (PC-IPL)
4 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एबी डिविलियर्सला एका नव्या भूमिकेत संघात स्थान देऊ शकते. डिविलियर्सने मागच्यावर्षी पूर्णपणे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक म्हणून डिविलियर्स संघामध्ये आपलं योगदान देऊ शकतो. (PC-IPL)
5 / 5
RCB येत्या 27 मार्चला आपला पहिला सामना खेळणार आहे. बँगलोरचा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे. (RCB TWITTER)