IPL 2022: जे कोणाला जमलं नाही, ते Mumbai Indians ने सीएसके विरुद्ध ‘या’ सीजनमध्ये पहिल्यांदा करुन दाखवलं
IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. आता मुंबई इंडियन्सने काही सामने जिंकलेत.
1 / 5
IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. आता मुंबई इंडियन्सने काही सामने जिंकलेत. पण त्यामुळे इतर संघाचं समीकरण बिघडलं आहे. मुंबईने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं. गुरुवारी दोन्ही संघांमध्ये सामना झाला. मुंबईने या सामन्यात असं एक काम केलं, जे याआधी या सीजनमध्ये झालं नव्हतं.
2 / 5
मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी काल भेदक मारा केला. चेन्नईच कंबरड मोडलं. पावरप्लेमध्ये चेन्नईचा स्कोर पाच बाद 32 होता. आयपीएल 2022 स्पर्धेत पहिल्यांदाच एका संघाने पावरप्लेमध्ये पाच विकेट गमावले.
3 / 5
मुंबईने आय़पीएल पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याचं काम पहिल्यांदा केलं नाही. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने अशी कामगिरी सर्वात जास्तवेळा केली आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी दोन वेळा अशी कामगिरी केलीय. अन्य आठ संघांनी प्रत्येकी एकदा पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याची करामात केली आहे.
4 / 5
मुंबई आणि चेन्नई सामन्यात एकूण पाच फलंदाज पायचीत झाले. यात तीन फलंदाज चेन्नईचे दोन मुंबईचे होते. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या सामन्यात पाच फलंदाज पायचीत झाले. याआधी 2017 साली मुंबई-केकेआर सामन्यात असं घडलं होतं.
5 / 5
चेन्नईचा या सामन्यात पाच विकेटने पराभव झाला. ते प्लेऑफच्या शर्यतीबाहेर गेले. चेन्नईची आयपीएलच्या प्लेऑफमध्ये न खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा असं झालं होतं.