आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ खराब फॉर्ममध्ये आहे. मुंबईच्या खराब फॉर्मची अनेक कारणं आहेत. रोहित शर्माचा हरवलेला सूर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे.
रोहित या सीजनमध्ये अजूनपर्यंत मोठी खेळी खेळू शकलेला नाही. आज चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही हाच सिलसिला कायम राहिला. चेन्नई विरुद्ध रोहित फक्त दोन चेंडूत तंबूत परतला. रोहित आज आऊट झाल्यानंतर एका खराब रेकॉर्डचीही त्याच्या नावावर नोंद झाली आहे.
गुरुवारी चेन्नई विरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या मुंबईला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि इशान किशन हे दोन महत्त्वाच्या विकेट गेल्या.
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा डक म्हणजे खातं उघडल्याशिवाय बाद होणारा फलंदाज बनला आहे. रोहित शुन्यावर आऊट होण्याची ही 14 वी वेळ आहे. याआधी पियूष चावला, हरभजन सिंह, पार्थिव पटेल 13 वेळा शून्यावर आऊट झालेत.
रोहितसाठी हा सीजन खूपच खराब ठरला आहे. धावांसाठी त्याचा संघर्ष सुरु आहे. मुंबईच्या कॅप्टनने सात डावात फक्त 114 धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या 41 आहे.