गुजरातनं चेन्नईविरुद्ध दोन सामने खेळले. त्यापैकी एका सामन्यात रवींद्र जडेजाने नेतृत्व केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरला होता. जडेजाच्या कर्णधारपदाच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 169 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गुजरातनं शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गाठलं होतं. अतितटीच्या सामन्यात डेविड मिलरने 94 धावांची खेळी केली होती. (फोटो- IPL)