CSK vs GT : आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कोण पडणार भारी? पाहा काय सांगते आकडेवारी

| Updated on: Mar 30, 2023 | 1:10 PM

1 / 5
आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने येणार आहेत. चेन्नईने आतापर्यंत चार जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर गुजरातनं गेल्यावर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री घेतली आणि पहिल्यात फटक्यात जेतेपदावर नाव कोरलं. (फोटो- IPL)

2 / 5
गुजरात टायटन्सनं गेल्या वर्षी चषक आपल्या नावावर केला होता. इतकंच काय तर 14 पैकी 10 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. क्वालिफायर आणि अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सला पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं. दुसरीकडे चेन्नईने 14 पैकी फक्त चार सामने जिंकत नवव्या स्थानावर होती. (फोटो- IPL)

3 / 5
दोन्ही संघांमध्ये मागच्या पर्वात दोन सामने खेळले गेले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभवाची धूळ चारली होती. गुजरातचा चेन्नईविरुद्ध विजयी रेकॉर्ड 100 टक्के आहे. (फोटो- IPL)

4 / 5
गुजरातनं चेन्नईविरुद्ध दोन सामने खेळले. त्यापैकी एका सामन्यात रवींद्र जडेजाने नेतृत्व केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरला होता. जडेजाच्या कर्णधारपदाच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 169 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गुजरातनं शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गाठलं होतं. अतितटीच्या सामन्यात डेविड मिलरने 94 धावांची खेळी केली होती. (फोटो- IPL)

5 / 5
दुसऱ्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरला होता. ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने 133 धावा केल्या. हे लक्ष्य गुजरातने सहज गाठलं. ऋद्धिमान साहाच्या 67 धावांच्या जोरावर संघाने पाच चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य गाठलं. (फोटो- IPL)