PBKS vs KKR | पंजाब किंग्सचा सौदा खरा ठरला! पहिल्याच सामन्यात 18.50 कोटीच्या सॅम करनने केली कमाल
आयपीएल 2023 स्पर्धेत पंजाब किंग्सनं विजयाने सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सला 7 धावांनी पराभूत केलं. पावसाच्या व्यत्यय आल्याने डकवर्थ लूईस नियमानुसार 7 धावांनी पंजाबचा विजय झाला. या सामन्यात पंजाब किंग्सचा सॅम करन चांगलाच चमकला.
Follow us
पंजाब किंग्स सर्वाधिक बोली लावत इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू सॅम करनला आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे त्याच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पहिल्याच सामन्यात सॅम करननं जबरदस्त कामगिरी केली. (Photo: PTI)
पंजाब किंग्सने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या लिलावात 18.50 कोटी खर्च करून 24 वर्षीय सॅम करनला आपल्या संघात घेतलं आहे. सॅम करन आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. (Photo: BCCI)
कोलकाता विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सॅम करनने जबरदस्त कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली छाप सोडली. शेवटच्या काही षटकात आलेल्या सॅम करनने 17 चेंडूत नाबाद 26 धावांची खेळी केली आणि संघआला 191 धावांपर्यंत पोहोचलवलं. (Photo: BCCI)
क्षेत्ररक्षणातही सॅम करनने कमाल दाखवली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना दुसऱ्या षटकात मंदीप सिंहचा झेल घेतला आणि पहिलं यश मिळवून दिलं. (Photo: BCCI)
गोलंदाजीतही सॅम करननं संघाचा डाव सावरला. केकेआरनं सुरुवातीचे काही गडी गमवून सामन्यात पुनरागमन केलं. तेव्हा 15 वं षटक सॅम करनला सोपवलं. तेव्हा त्याने रसेलची विकेट घेतली. (Photo: BCCI)
रसेलची विकेट गेल्याने 16 व्या षटकात काहीच धावा आल्या नाहीत. त्यामुळे पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबला फायदा झाला. पंजाबचा संघ 7 धावांनी विजयी झाला. (Photo: BCCI)