IPL 2023: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लागोपाठ दोन पराभवामुळे धक्का बसला आहे. त्यानंतर आता आरसीबीने ग्रीन जर्सी परिधान करून सामना खेळण्याची तारीख निश्चित केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध हा सामना असेल. (Photo - Twitter)
आरसीबीचा पुढचा सामना 15 एप्रिल 2023 रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. मात्र 23 एप्रिल रोजी आरसीबी हिरव्या जर्सीमध्ये खेळणार आहे. त्यात चिन्नास्वामी स्टेडियम असल्याने रंगत आणखी वाढणार आहे. (Photo - Twitter)
23 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबी हिरवी जर्सी परिधान करेल. आरसीबी फ्रँचायझी यासह होम ग्राउंडवर गो ग्रीन मोहीम राबवणार आहे. (Photo - Twitter)
2011 पासून आरसीबी संघ आयपीएलमध्ये गो ग्रीन मोहीम राबवते. प्रत्येक हंगामातील एका सामन्यात हिरव्या जर्सीत खेळते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे वाचवा-वाढवा हा संदेश देत आरसीबी हिरव्या जर्सीमध्ये मैदानात उतरते. (Photo - Twitter)
2021 च्या आयपीएलमध्ये आरसीबी हिरव्या जर्सीऐवजी निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरली होती. तेव्हा कोरोना वॉरियर्सला आदर देण्यासाठी आरसीबीने केकेआरविरुद्ध पीपीआय किट रंगाच्या जर्सीत सामना खेळला होता. (Photo - Twitter)
चार वर्षांनंतर आरसीबी संघ पुन्हा हिरव्या जर्सीमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्स संघासोबत सामना असणार आहे. (Photo - Twitter)