IPL 2023 स्पर्धेत आतापर्यंत या खेळाडूंनी पाडली छाप, वाचा कोण कोण आहे यादीत
IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेत अतितटीच्या सामन्यांची मेजवानी पाहायला मिळत आहे. कधी कोणता सामना फिरेल सांगता येत नाही. युवा खेळाडूंनी तर भल्याभल्यांना पाणी पाजलं आहे. चला जाणून घेऊयात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबाबत
1 / 5
आयपीएल 2023 स्पर्धेच खऱ्या अर्थाने कोणाचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंहचं.. या हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली. गुजरात टायटन्सला शेवटच्या पाच चेंडूवर सलग पाच षटकार ठोकत विजय मिळवून दिला. त्यानंतरही त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने पाच सामन्यात एकूण 174 धावा केल्या आहेत. (Photo- IPL/BCCI)
2 / 5
गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शननंही चांगली कामगिरी केली आहे. 21 वर्षीय साई सुदर्शननं जबरदस्त कामगिरी करत पाच सामन्यात 176 धावा केल्या आहेत. (Photo- IPL/BCCI)
3 / 5
मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा या यादीत असून त्याने 2023 आयपीएलची धमाकेदार सुरुवात केली आहे. बंगळुरू विरुद्ध त्याने 84 धावांची खेळी केली होती. (Photo- IPL/BCCI)
4 / 5
चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाडही चांगल्या फॉर्मात आहे. पाच सामन्यात त्याने 200 धावा केल्या आहेत. हाच फॉर्म कायम राहिला तर त्याला टीम इंडियात नक्कीच स्थान मिळेल.(Photo- IPL/BCCI)
5 / 5
फलंदाजांसोबत गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज रवि बिष्णोई याने 5 सामन्यात 16.50 च्या सरासरीने 8 गडी बाद केले आहेत. (Photo- IPL/BCCI)