ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज असलेल्या स्टीव्ह स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. दिल्लीने स्मिथसाठी 2.2 कोटी मोजले आहेत. स्मिथची 2 कोटी इतकी बेस प्राईज होती. तर बाांग्लादेशच्या शाकिब अल हसनला 3.2 कोटी रुपयांना कोलकातानं खरेदी केला.
अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. बंगळुरुने मॅक्सवेलसाठी तब्बल 14 कोटी 25 लाख इतकी रक्कम मोजली आहे. तर इंग्लंडच्या मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्जनं 7 कोटी बोली लावली.
ख्रिस मॉरीस (Chris Morris) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ख्रिस मॉरीससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मॉरीसची बेस प्राईजही 75 लाख रुपये इतकी होती. तर शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सनं 4.4 कोटींना खरेदी केले.
इंग्लंडच्या डेव्हिड मलानला किंग्ज इलेव्हन पंजाबनं 1.5 कोटीला संघात घेतले.
झाय रिचर्डसनसाठी (jhye richardson) पंजाब किंग्जने (Punjab Kings) 14 कोटीमध्ये आपल्या संघात घेतलं आहे. रिचर्डसनची बेस प्राईज ही 1 कोटी 50 लाख इतकी होती. नॅथन कुल्टर नाईलला (Nathan Coulter Nile) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 5 कोटी माजून आपल्या ताफ्यात घेतले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर दिल्लीनं 1 कोटींची बोली लावली. राजस्थानने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला 1.5 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
आयपीएलमध्ये भारताच्या युवा खेळाडूंना 20 लाखांची बोली लावत विविध संघांनी खरेदी केले.
भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारावर चेन्नई सुपर किंग्जनं 50 लाख, जगदीशन सुचित यावर 30 लाख रुपये सनरायझर्स हैदराबाद तर मोहम्मद अझरुद्दीनला आरसीबी 20 लाखांना खरेदी केले.
युवा ऑलराउंडर कृष्णप्पा गौतमला (krishnappa gowtham) चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने गौतमसाठी 9 कोटी 25 लाख मोजले आहेत. तो सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. त्याची बेस प्राईजही 20 लाख इतकी होती. देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्याची बेस प्राईज ही एकूण 20 लाख होती. मात्र त्यासाठी पंजाबने 5 कोटी 25 लाख मोजले. दरम्यान आता शाहरुख पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) फिरकीपटु पियूष चावलाला (Piyush Chawala) आपल्या ताफ्यात घेतलं आहे.