घरात पोपट पाळणं शुभं की अशुभ? एकटा पोपट पाळल्याने तर…

घरात पोपट पाळणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. ते आर्थिक समृद्धी, व्यवसायातील यश आणि पती-पत्नीतील प्रेमात वाढ करते. पूर्व किंवा उत्तर दिशेत पोपट जोडीने पाळणे श्रेयस्कर आहे. पोपट मुलांची एकाग्रता वाढवून त्यांच्या अभ्यासात मदत करतो.

| Updated on: Apr 09, 2025 | 5:42 PM
1 / 9
आपल्यापैकी अनेकांना पाळीव पक्षी, प्राणी पाळण्याचा छंद असतो. काही जणांना मासे पाळण्यास आवडतात. तर काही जण घरात कुत्रा, मांजरे पाळतात. तर काहींना पोपट पाळण्याचा छंद असतो.  पोपट पाळणे शुभ असते की अशुभ असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.

2 / 9
घरात पोपट पाळणे हा केवळ एक छंद नसून ते अनेक दृष्टीने शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पोपट पाळण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते, असे मानले जाते.

3 / 9
घरात पोपट पाळल्याने आर्थिक लाभ होतो आणि व्यवसायात भरभराट होते. पोपट हा कामदेवाचे वाहन आहे आणि त्याचा संबंध संपत्तीची देवता कुबेर यांच्याशी देखील आहे. त्यामुळे घरात पोपट असणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते.

4 / 9
पोपटाचा रंग हिरवा असल्यामुळे तो बुध ग्रहाचा कारक मानला जातो. बुध ग्रह बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध ग्रह प्रभावी असतो, ते बुद्धिमान आणि कुशल व्यापारी बनू शकतात. त्यामुळे घरात पोपट पाळल्याने बुद्धी आणि व्यापारात सकारात्मकता येते.

5 / 9
जर तुम्ही घरात पोपट पाळत असाल, तर वास्तुशास्त्रानुसार त्याची योग्य दिशा निवडावी. पोपटासाठी पूर्व किंवा उत्तर दिशा शुभ मानली जाते. या दिशेला पोपट ठेवल्याने घरात लक्ष्मी आणि कुबेर देवांची कृपा असते.

6 / 9
वास्तुशास्त्रानुसार घरात एकटा पोपट कधीच पाळू नये. त्याऐवजी नेहमी पोपट आणि मैना यांची जोडी पाळावी, ते अधिक शुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

7 / 9
पोपट घरातील लोकांवर येणाऱ्या समस्यांपासून दूर ठेवतो, असे मानले जाते. ज्या घरात पोपट असतो, ते घर भाग्यवान असते. त्यांच्यावर सदैव देवांची कृपा असते.

8 / 9
जर तुमच्या घरी लहान मुले शिकत असतील आणि त्यांना अभ्यासात रस नसेल, तर पोपट पाळणे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पोपट पाळल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांना अभ्यासात रुची निर्माण होते.

9 / 9
घरात पोपट पाळणे हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते वास्तुशास्त्रानुसार अनेक सकारात्मक ऊर्जा आणि लाभांना आकर्षित करते.