भारताची चांद्रयान 3 मोहिम निर्णायक टप्प्यावर आहे. पुढच्या दोन दिवसात चांद्रयान-3 च चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. पण त्याआधी चांद्रयान 3 ने पाठवलेले काही खास फोटो पाहा.
चांद्रयान 3 ने चंद्राच्या फार साइडचे फोटो पाठवले आहेत. पृथ्वीवरुन दिसत नाही, अशा भागाचे हे फोटो आहेत. चांद्रयान 3 आता 25 किलोमीटर x 134 किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करत आहे.
दूर अंतरावरचे हे फोटो आहेत. लँडरवरील हझार्ड डिटेक्शन अँड एव्हॉयडन्स कॅमेऱ्याने हे फोटो काढले आहेत. चंद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी हा कॅमेरा मदत करणार आहे.
चंद्रावर वेगवेगळ्या जागांवरील खड्डयांचे हे फोटो आहेत. काही खड्डे खूपच भयानक दिसत आहेत. काही फोटोंमध्ये मोठा मैदानी प्रदेश दिसतोय.
LHDAC कॅमेरा चंद्रावर सेफ लँडिंगसाठी बनवला आहे. ISRO च्या स्पेस स्पेस एप्लीकेशन सेंटर (SAC) अहमदाबादने हा कॅमेरा बनवला आहे. कॅमेरा आणि काही पेलोड्स मिळून काम करतील.