पावसाळा म्हटलं की सगळ्यात पहिलं आठवते ती छत्री.
जोरदार पावसात, सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेकदा छत्रीमध्ये बिघाड होतो. त्यामुळे छत्रीची निगा राखणे खूपच महत्त्वाचं असतं. पावसाळ्यासाठी चांगली छत्री निवडणं अत्यंत महत्वाचं असतं.
कधी कधी पावसात हवेच्या वेगाने छत्री उलटी होण्याची मज्जा प्रत्येकाबरोबरच घडते.
अनेकदा एक पावसाळा एका छत्रीत जाणं शक्यच नसतं. कारण आपण छत्री कुठे ना कुठे विसरतोच.
जर योग्य पद्धतीने छत्रीची काळजी घेतली आणि आपण ती कुठेही विसरलो नाही तर आरामात एक पावसाळा तुम्ही एकच छत्री वापरुन काढू शकता.
छत्री विकत घेताना चांगली क्वालिटी आणि टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्री निवडा. बाजारात असलेल्या स्वस्त दरातील, मात्र टिकाऊ नसलेली छत्री विकत घेऊ नका. प्लास्टिकच्या तारा असलेली छत्री विकत घेऊ नका.
फॅशनेबल छत्री घेण्याच्या नादात ती टिकाऊ आहे की नाही पाहणं विसरू नका.
ओली छत्री बंद केल्यास तिच्या काडय़ा गंजतात तसंच तिचा कपडा देखील खराब होते. त्यामुळे छत्री बंद करण्यापूर्वी ती सुकवणे अत्यंत गरजेचे आहे.
दरवर्षी मार्केटमध्ये कलरफुल छत्र्या मिळतात. पण कलर आणि फॅशनच्या छत्र्या खरेदी करताना त्यांच्या क्विलिटी पण चेक करूनच छत्र्या खरेदी करा.
शेवटी पावसाळा आणि छत्री हे अत्यंत जवळचं नातं आहे. एक छत्री कुठे ही न विसरता वापरली तर नक्की तुम्ही एकच छत्री एका पावसाळ्यात वापरू शकता.