चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात सध्या कुठलेही निवडणूक नसतांना एक आगळी वेगळी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. पिलखोड गावात सुरु असलेली, देशीदारू विक्री बंद व्हावी या साठी गावातील महिलांनी लढा उभारला होता.
गावातील देशी दारूचे दुकान बंद व्हावे अशी मागणी महिलांनी प्रशासनाकडे केली होती.
या लढ्याला यश मिळाले असून,देशी दारू विक्री विरोधात पिलखोड गावात मतदान घेण्यात आले. सर्वात जास्त मत हे आडवी बाटलीला मिळाले आहे.
विशेष म्हणजे गावातील शेकडो महिलांनी आडवी बाटली या निशाणी समोर शिक्का मारून देशी दारू विक्री विरोधात मतदान केले.
अखेर महिलांनी दारूची बाटली गावातून कायमची हद्दपार केली आहे.