
एका दिवसाच्या घसरणीनंतर सुवर्णनगरीत सोने आणि चांदीने युटर्न घेतला. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे,

आज जळगाव येथील सुवर्णपेठेत सोन्याचे दर 2300 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली.

सोन्याचे दर आज जीएसटीसह 94 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहे तर चांदीचे दर 96 हजार 820 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसात सोने दरात मोठी घसरण झाली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांचा धोरण तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्व गोष्टींचा सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम होत आहे