अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे.
सध्या राज्यात लॉकडाऊन असल्यानं जान्हवी व्हेकेशनवर आहे. नुकतंच तिनं सूर्यास्तासोबत फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी कपूरनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जान्हवीनं नुकतंच रुही या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत धमाकेदार काम केलं आहे.
जान्हवीनं ‘गुंजन सक्सेना’, ‘धडक’, ‘रुही’ या चित्रपटांमध्ये सुंदर अभिनय केला आहे.
आता जान्हवी कपूर सध्या आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करतेय. याची झलक ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देतेय. आता तिनं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.