सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघी खूप चांगला मैत्रिणी आहेत. विशेष म्हणजे अनेकदा या दोघी फिरायला देखील सोबत जातात. मात्र, सारा अली खान हिने खूप मोठी चुक केदारनाथ दर्शनासाठी गेल्यावर केली होती.
काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सारा अली खान हिने एक हाॅटेल बुक केले होते. मात्र, त्यानंतर मोठी घटना घडली.
सारा अली खान हिने पैसे वाचवण्यासाठी एकदम साधे हाॅटेल बुक केले होते. इतकेच नाही तर तेथील बाथरूम देखील खराब होते. त्यांनी पांघरण्यासाठी देखील काहीच दिले नव्हते.
सारा अली खान हिची पोलखोल करत जान्हवी कपूर म्हणाली की, साराने पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये इतके भंगार हाॅटेल बुक केले की, मला थंडीमध्ये राहवे लागले. त्यांच्याकडे हिटर देखील नव्हते.
यावर सारा म्हणाली की, आम्हाला त्या हाॅटेलमध्ये फक्त तीन तास थांबायचे होते. यामुळे मी कशाला पैसे खर्च जास्त करायचे म्हणून साधे हाॅटेल बुक केले. मात्र, त्यानंतर मला त्याचा पश्चाताप झाला.