Janhvi Kapoor: निळया रंगाच्या जंपसूटमधील जान्हवीचा ‘हॉट लूक’
नुकतीच जान्हवी कपूर 'गुड लक जेरी' चित्रपटाचे प्रमोशन करून मुंबईत परतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दुबईत होती. मुंबईत येताच फोटोग्राफर्सनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले
1 / 7
अगदी लहान वयात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जान्हवी कपूरचे आज करोडो चाहते आहेत. तिचे लूक अनेकदा चाहत्यांचे होश उडवतात. सोशल ,मीडियावर सक्रिय असलेली जान्हवी कायम आपले बोल्ड व ब्युटीफुल फोटो शेअर करत असते.
2 / 7
जान्हवी अनेक चित्रपटामध्ये कार्यरत असून , 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटासाठी जान्हवी कपूर या चित्रपटाबद्दल जितकी उत्सुक आहे तितकेच तिचे चाहतेही उत्सुक आहेत.
3 / 7
नुकतीच जान्हवी कपूर 'गुड लक जेरी' चित्रपटाचे प्रमोशन करून मुंबईत परतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दुबईत होती. मुंबईत येताच फोटोग्राफर्सनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
4 / 7
यादरम्यान जान्हवी कपूरने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती सौंदर्यासह खूपच बोल्ड दिसत आहे. जान्हवीचे असे अनेक फोटो तुम्ही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.
5 / 7
'गुड लक जेरी'चा ट्रेलर नुकताच समोर आला असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.याशिवाय तिचा राजकुमार रावसोबतचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपटही ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे."
6 / 7
गुड लक जेरी हा क्राइम कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका अडचणीत सापडलेले कुटुंब, ड्रग माफिया आणि पोलीस यांच्याभोवती फिरते.
7 / 7
कथेत कॉमेडी देखील असून, या चित्रपटात जान्हवीशिवाय दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.