सध्या ज्या फिश मार्केटची चर्चा रंगली आहे, हा फिश मार्केट भारतात नाही तर, जपान याठिकाणी आहे. जपानची राजधानी टोक्यो येथील सुकिजी याठिकाणी जगातील सर्वांत मोठं फिश मार्केट आहे.
सुकिजी येथील बाजार एक होलसेल मार्केट आहे. जपान देशातील हे फिश मार्केट फार जुनं आहे. सुकिजी याठिकाणी असलेला बाजार समुद्रातील जीव आणि माशांसाठी प्रसिद्ध आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुकिजी येथे असलेल्या मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी 2000 मीट्रिक टन सीफूड विक्री होतो. गेल्या अनेक वर्षांपासून मार्केट सुरु आहे.
फिश मार्केट पाहाण्यासाठी अनेक पर्यटक देखील सुकिजी मार्केटला भेट देतात. येथे मासे खरेदी करण्यासाठी बोली लावली जायची... ही बोली सकाळी 5.30 ते 10 वाजे पर्यंत सुरु असायची...
मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे मिळतात. मार्केटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. जपान देशा त्यांच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो.