यंदाच्या एकदवसीय वर्ल्ड कप 2023 ला काही महिने आता शिल्लक आहेत. त्याआधी आशिया कप होणार असल्याने टीम इंडियासाठी मोठी संधी आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू परत एकदा संघात परतण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Jasprit bumrahभारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेटमध्ये नव्या दमाने गोलंदाजीचा सराव करताना दिसला.
जसप्रीत बुमराहनंतर मधल्या फळातील महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यरने नेटमध्ये सराव सुरू केला आहे. पाठीच्या दुखापतीशीही तो बराचवेळ संघाच्या बाहेर आहे. या दुखापतीमुळे अय्यरला आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी मुकला होता.
या दोघांसोबतच प्रसिद्ध कृष्णाही सराव करत असल्याची माहिती समजत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो आयपीएलमधूनही बाहेर झाला होता.
दरम्यान, जर बुमराह आणि अय्यर संघात परतले तर संघाची ताकद आणखीन वाढणार आहे.