मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये पोहोचली आहे. त्याला कारणही स्पेशल आहे.
ती आता नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. कोरोनामुळे थांबलेल्या कामाला आता तिनं परत सुरुवात केली आहे. आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच ती लंडनला गेली आहे.
'#postcovid पहिलीच फिल्म शूट करतेय... माझी तर #2020 मधलीच पहिली...वर्ष संपण्याआधी ही संधी मिळाली ??' असं कॅप्शन देत तिनं टीमसोबत एक फोटो शेअर केला आहे.
लोकेश विजय गुप्ते हे हा चित्रपट दिग्दर्शीत करत आहेत. या चित्रपटात सोनालीसोबत अभिनेता हेमंत ढोमेसुद्धा दिसणार आहे.
सोनाली सध्या लंडनमध्ये धमाल करत आहे. सोबतच ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटोसुद्धा पोस्ट करत आहे.