PHOTO : भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीसाठी जोरदार मोर्चेबांधणी, ममता बॅनर्जींनंतर केसीआर महाराष्ट्रात; पवार आणि ठाकरे भेटीत प्रकाश राजही उपस्थित!
भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीसाठी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केसीआर पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी पवार आणि केसीआर यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली.
Most Read Stories