अभिनेत्री काजल अग्रवाल नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. प्रियकर गौतम किचलूसोबत तिनं लग्नगाठ बांधली आहे.
मुंबईत तिचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर आता तिनं नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
वेगवेगळ्या थीमसोबत तिनं फोटोशूट केला आहे. याची झलक ती तिच्या इन्स्टाग्रामवरुन सतत देत आहे.
नवऱ्यासोबत तिनं रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हे फोटोशूट केल्याचं दिसतंय. या फोटोच्या मागे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दिसत आहे.
पेस्टल रंगाच्या ट्रेंडिंग कपड्यांमध्ये ही जोडी कमालीची दिसत आहे.