अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या 'थलायवी' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटाशी संबंधित अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातील कंगनाच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. कंगनाची ही वेगळी शैली सर्वांना प्रोत्साहन देत आहे.
प्रेक्षकांचा उत्साह वाढवत कंगना राणौतने थलायवीच्या सेटवरील आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये कंगना रनौत हुबेहूब जयललितांसारखी दिसत आहे.
याआधीही कंगना रनौतने सेटवरील बरेच फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी ट्विट करत 'थलायवी'च्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करत असल्याचे तिने म्हटले होते.