तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. बिग बाॅस 15 पासून तेजस्वी आणि करण हे एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे यांची जोडी चाहत्यांना देखील प्रचंड आवडते.
नुकताच अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी लग्न केले आहे. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये करण आणि तेजस्वी यांनी सात फेरे घेतले आहेत.
कोब्बी शोशानीने शेअर केलेल्या पोस्टनंतर चर्चांना उधाण आले. कारण या पोस्टमध्ये म्हटले आहे की, करण आणि त्याच्या पत्नीला भेटून खूप छान वाटले. आता यावरूनच ही चर्चा सुरू आहे.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 मध्येच झाली. तेंव्हापासून हे एकमेकांना डेट करताना दिसत आहेत. चाहते देखील यांच्या लग्नाची वाट पाहत होते.
काही दिवसांपूर्वीच तेजस्वी प्रकाश हिने दुबईमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. गोव्यामध्ये करण कुंद्रा याच्यासोबत धमाल करताना देखील तेजस्वी प्रकाश ही दिसली होती.