कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. आज मतदान पार पडतंय. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मतदान केलं.
देशाचे माजी पंतप्रधान, जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनीही आज मतदान केलंय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. बोम्मई यांनी मतदानाआधी हुबळीतल्या हनुमान मंदिरात जात दर्शन घेतलं. त्यांनंतर मतदान केलं.
भाजपचे नेते तेजस्वी सूर्या यांनीही आज मतदान केलं. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री सई लोकुर ही बेळगावची आहे. तिनेही आज मतदान केलं आहे. याचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.