गायिका कार्तिकी गायकवाड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
लग्न झाल्यापासून कार्तिकी सोशल मीडियावरुन चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.
काही महिन्यांपूर्वीच कार्तिकी विवाह बंधनात अडकली आहे. त्यामुळे यावर्षीची ही संक्रांत तिच्यासाठी स्पेशल ठरली आहे.
लग्नानंतर कार्तिकीची ही पहिली संक्रांत असल्यानं तिच्या घरच्यांकडून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
प्रथे प्रमाणे कार्तिकीला हलव्याचे दागदागिने देण्यात आहे.
या दागिन्यांमध्ये कार्तिकी सुंदर दिसत होती.