‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.
अनलॉकमध्ये जुलै महिन्यात कार्तिकीनं साखरपुडा केला आणि काही दिवसांपूर्वीच ती विवाह बंधनात अडकली.
आता कार्तिकी आणि तिचा पती रोनितच्या लग्नाचा रोमॅण्टिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान हिट होतोय.
या व्हिडीओत बॅकग्राऊंडला 'जिंदगी का सफर अब तेरे साथ में!' हे सुंदर गाणं ऐकू येतंय. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं स्वत: कार्तिकीनं गायलंय.
आपल्या खणखणीत आवाजानं रसिक प्रेक्षकांना वेड लावणारी कार्तिकी गायकवाड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.