कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण मालदीवमध्ये सुरू आहे. गेले अनेक दिवस ती मालदीवच्या सौंदर्याची झलक तिच्या चाहत्यांना देत आहे.
आता ती नवा फोटोशूट घेऊन समोर येणार असल्याचं दिसतंय. तिनं हा झक्कास फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ती सतत शूट लोकेशनचे आणि टीमचे फोटो पोस्ट करत आहे.
आता तिच्या या चित्रपटाची उत्सुकता तिच्या चाहत्यांना चांगलीच लागली आहे.