अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी इन्स्टाग्रामवर हळदीचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना होळीच्या दिवशी खास भेट दिली आहे.
सिद्धार्थ आणि किआरा यांनी होळीच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, 'माझ्याकडून आणि माझ्या प्रेमाकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा..' सध्या सिद्धार्थ आणि किआरा यांनच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा तुफान रंगत असते. लग्नानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही.
‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या. आता अनेक ठिकाणी दोघे पती - पत्नी म्हणून एकमेकांचा उल्लेख करतात.