मुंबईतील जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटरमध्ये नुकतंच किड्स इंडिया या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी भारतातील नव्हे तर जगभरातील उद्योगपती उपस्थित होते.
१२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर असे तीन दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अनेक उद्योगपती, छोटे-मोठे व्यापारी, स्टार्टअप कंपन्यांनीही हजेरी लावली.
किड्स इंडिया या प्रदर्शन सोहळ्यात लाकडापासून निर्मित होणारी खेळणी, विविध कपडे, वस्तू, मेकअप यांसह अभ्यासासाठी लागणारी काही पुस्तक, गोष्टींच्या पुस्तकांसह इलेक्ट्रॉनिक आणि शैक्षणिक खेळण्यांचाही समावेश होता.
तसेच यावेळी लहान बाळांसाठीचे कपडे, त्यांच्यासाठी लागणारी काही खेळणीही या प्रदर्शनात उपलब्ध होती.
यंदा या ट्रेड शोसाठी १२० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी आपआपली उत्पादने प्रदर्शनासाठी मांडली होती. तर १५० हून अधिक स्टार्टअप कंपन्याही यात सहभागी झाल्या होत्या. फक्त भारतातील नव्हे तर ३३ देशातील ५ हजारांहून अधिक विदेशी व्यापारीही यात प्रदर्शनात सहभागी झाले होते.
दोन वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला व्यापारांसह राज्यासह भारतातील अनेक लहान उद्योगपतीही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्पिल्वारेनमेसे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात आले होते.
किड्स इंडिया हा ट्रेड शोमध्ये येत्या वर्षभरात भारतासह जगभरात वर्षभरात कोणकोणते नवनवीन उत्पादने येणार आहेत, याचा एक विस्तृत आढावा देतो. यात दरवर्षी विविध नवनवीन उत्पादनेही पाहायला मिळतात. यंदाही इथे काही नवीन वस्तू उपलब्ध होत्या.
या प्रदर्शनामुळे भारतातील अनेक खेळण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विशेष ओळख मिळाली आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात.