कॉम्प्युटर रिफ्रेश केल्याने स्पीड आणि परफॉर्मन्स सुधारतो का ? 99% लोक देतात चुकीचे उत्तर
कॉम्प्युटर रिफ्रेश केल्याने नक्की काय होतं, हे जाणून घ्यायचं असेल तर हे जरूर वाचा.
Follow us
आपल्यापैकी बरेच जण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ऑन करताच रिफ्रेश करतात. मग लोक F5 दाबायला लागतात. लोकांना असे वाटते की यामुळे परफॉर्मन्स सुधरतो. पण खरं काही वेगळंच आहे.
बर्याच लोकांना असे वाटते की सिस्टम चालू केल्यानंतर, होम स्क्रीन रीफ्रेश केल्याने किंवा वारंवार F5 दाबल्याने सिस्टमची कार्यक्षमता सुधारते किंवा RAM मोकळी होते. मात्र, या प्रकरणात तथ्य नाही. हा केवळ एक भ्रम आहे. रीफ्रेश केल्याने कॉम्प्युटरचा वेगही वाढत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की मग त्याचा उपयोग काय?
तुम्ही तुमचा डेस्कटॉप म्हणजेच होम स्क्रीन रिफ्रेश केल्यास, ते लेटेस्ट माहितीसह फोल्डर दाखवते. उदाहरणार्थ – जर तुम्ही फोल्डर्सचे नाव बदलले असेल, पण ते अल्फाबेटिकली अरेंज केलं नसेल तर रिफ्रेश केल्यावर ते व्यवस्थित अरेंज होतं.
तसंच जर तुम्ही तुमच्या कोणत्याही फोल्डरमध्ये काही बदल केले असतील किंवा कोणतेही शॉर्टकट तयार केले असतील परंतु तुम्हाला ते बदल दिसत नसतील, तर रिफ्रेश केल्यास ते बदल दिसून येतील. रिफ्रेश केल्याने मुख्यत्वे सिस्टममध्ये केलेले बदल दिसतात. रिफ्रेशमुळे पेज रिलोड होते.
जर तुम्हाला खरोखरच सिस्टीमचा वेग आणि परफॉर्मन्स सुधारायचा असेल तर रिफ्रेश ऐवजी रिस्टार्ट हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. कॉम्प्युटर वापरत असताना अनेक प्रोग्राम बॅकग्राउंडमध्ये चालू शकतात, ज्यामुळे मेमरी भरू शकते. अशा वेळी रीस्टार्ट केल्याने या प्रोसेस साफ करण्यात आणि मेमरी मोकळी करण्यात मदत होऊ शकते.